उत्तर प्रदेशात शक्‍य, महाराष्ट्रात का नाही? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

जळगाव - शेतकरी कर्जमाफीच्या विषयावरून विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला, तरीही या प्रश्‍नी सरकारच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, त्यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकार किती उदासीन आहे, हेच दिसून येते असा आरोप करत उत्तर प्रदेशात कर्जमाफी शक्‍य आहे, मग महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

संवाद दौऱ्यानिमित्त जळगावी आल्यानंतर सायंकाळी पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, ""मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार कर्जमाफी हा दीर्घकालीन उपाय नाही, याची आम्हालाही जाणीव आहे. मात्र सध्या शेतकरी कमालीचा अडचणीत असताना त्याला तात्पुरता दिलासा म्हणून कर्जमाफी देणे अपरिहार्य आहे. कर्जमाफी द्यायची की नाही, योग्य वेळी देऊ याचा विचार न करता त्यातून काहीतरी मार्ग तातडीने काढला पाहिजे. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घेतला. मग उत्तर प्रदेशात शक्‍य झाले, ते महाराष्ट्रात का होऊ नये? सत्तेत येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांची भाषा आणि आता सत्तेत आल्यानंतरचे वागणे यात मोठा फरक आहे.'' 

Web Title: Farmer loan issue