Dhule Success Story : एकाच प्रयत्नात 5 स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण; सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा विक्रम!

suraj Pardeshi
suraj Pardeshiesakal

Dhule Success Story : येथील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने एकाच प्रयत्नात (Dhule News) वेगवेगळ्या पाच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम करीत भरतीसाठी पात्र ठरला आहे. (farmer son clear 5 different competitive exams in single attempt dhule news)

त्याचे कर्तृत्व पाहून शेकडो युवकांनी व्हॉट्सॲपवर त्याचे स्टेटस ठेवले असून, गावाने त्याचे कौतुक केले. सूरज दिनेशसिंग परदेशी (वय २४) असे त्या युवकाचे नाव असून, तो दिनेशसिंग परदेशी या सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याचे आजोबा (कै.) बलरामसिंग परदेशी आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते होते.

सूरज एकाच प्रयत्नात नाशिक ग्रामीण पोलिस, ठाणे ग्रामीण पोलिस, बीएसएफ, स्टाफ सिलेक्शन कमिशन, शिक्षक अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण होऊन भरतीस पात्र ठरला. नुकतेच हे निकाल जाहीर झाले. सूरजने येथेच माध्यमिक शिक्षण व कला शाखेतील पदवी घेतली. पुढे शहरात बीपीएड केले. दररोज शेतात राबत शिक्षण पूर्ण केले.

suraj Pardeshi
Nashik News : नाशिकमधल्या मराठी भाषा अभ्यासकेंद्राच्या कामाला वेग; सत्यजीत तांबेनी घेतला आढावा

पहाटे पाच किलोमीटर धावणे, दिवसा शेती व रात्री चार तास अभ्यास करून हे यश मिळविले. नाशिक ग्रामीण पोलिसांत भरती होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. निकाल समजताच मित्रांनी गुलालाची उधळण करीत त्याचे अभिनंदन केले.

तलवारबाजीत तरबेज

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची इच्छा असलेल्या येथील ३५ विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने भाड्याने अभ्यासिका तयार केली असून, प्रत्येकी १०० रुपये मासिक भाडे देऊन रात्रंदिवस अभ्यास करतात. सूरजने याच अभ्यासिकेत मन लावून अभ्यास केला.

सूरज परदेशी स्वतः दंड, लाठी व तलवारबाजीत तरबेज असून, त्याने अनेक लहान-मोठ्या मुलांना काठी व तलवार फिरविण्याचे प्रशिक्षण दिले व देत आहे. अनेक मुलीही काठी व तलवार फिरविण्यात तरबेज झाल्या आहेत.

suraj Pardeshi
Nashik News: आमदार, पोलिस, अन डॉक्टरांना लाखोली; जिल्हा रुग्णालय आवारात मद्यपीचा तासभर गोंधळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com