बागलाणला तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

Suicide
Suicide
नाशिक - मौजे पठावे दिगर (ता. बागलाण) येथील देवराम चिंतामण गांगुर्डे (वय 21) या तरुण शेतकऱ्याने गेल्या शनिवारी (ता. 27) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. यामुळे गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 84 शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे आपली जीवनयात्रा संपविल्याचे समोर आले. जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुक्‍यांत आतापासूनच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यातच सततची नापिकी, सरकारसह खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करू, या विवंचनेत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने दहा महिन्यांतच हा आकडा 84 वर पोचला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com