कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

निजामपूर (जि. धुळे) - भामेर (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी कैलास यादव सोनवणे (वय 32) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

निजामपूर (जि. धुळे) - भामेर (ता. साक्री) येथील तरुण शेतकरी कैलास यादव सोनवणे (वय 32) याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

दीड लाख रुपये खर्चून लावलेल्या कांद्याचे उत्पन्न अवघे दहा हजार रुपये आल्याने कर्ज फेडायचे कसे, या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचे त्याचा भाऊ संजय सोनवणे याने सांगितले. कैलास हा मंगळवारी (ता. 10) सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातून घरी आला. त्यानंतर तो बाहेर गेला; पण रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही, त्यामुळे त्याची पत्नी गीताबाईने दिराला सांगितले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बराच वेळ शोधाशोध केली. काहींनी त्याच्या शेतात जाऊन पाहिले असता विहिरीत चप्पल व तंबाखूची पुडी तरंगताना दिसली. रात्री वीजपंपाद्वारे पाण्याचा उपसा केल्यानंतर आज सकाळी कैलासचा मृतदेह आढळला.

Web Title: farmer suicide in bhamer