निराशेतून मुखेडला शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुखेड - मुखेड (ता. येवला) येथील शेतकरी दीपक एकनाथ वझरे (वय ६०) यांनी कर्जबाजाराला कंटाळून मंगळवारी पहाटे घरात फेट्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काल तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी मुखेडला येत वझरे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दोन-तीन दिवसांपूर्वीच मुलीच्या विवाहासाठी स्थळ बघण्यासाठी गेले होते. परंतु मुलीच्या विवाहाआधीच वडिलांनी आत्महत्या केली.

वझरे यांच्यावर पतपेढ्यांचे आणि सोसायटीचे अंदाजे पाच ते सात लाख रुपये कर्ज होते. अलीकडेच त्यांनी दोन एकर क्षेत्र जमिनीची विक्री करून कर्जाची काही प्रमाणात परतफेड केली होती. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक अविवाहित मुलगी, एक विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

अविवाहित असलेल्या मुलीच्या लग्नाचीही काळजी त्यांना होती. उसनवार घेतलेले पैसे, सोसायटीचे कर्ज या सर्व गोष्टींमुळे अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. वझरे यांची मुखेड येथे शेतजमीन आहे. त्यांनी मक्‍याची लागवड केली होती. परंतु उत्पादन न मिळाल्याने आणखी ओढाताण सुरू झाली. शेतीला जोडधंदा म्हणून चहा विक्रीचा वडिलोपार्जित व्यवसाय ते सांभाळत होते. परंतु चहाच्या व्यवसायातही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने दिवसेंदिवस कुटुंबातील समस्या वाढत गेल्याने चिंतेत भर पडत गेली होती.

Web Title: Farmer Suicide in Mukhed