नाशिक: नांदगावमध्ये 40 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नांदगाव : सावरगाव येथील चाळीस वर्षीय शेतकऱयाने आज (रविवार) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व बायकोच्या आजारपणावरचा खर्च पेलवत नसल्याच्या प्रकारामुळे त्याने हा प्रकार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

नांदगाव : सावरगाव येथील चाळीस वर्षीय शेतकऱयाने आज (रविवार) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी व बायकोच्या आजारपणावरचा खर्च पेलवत नसल्याच्या प्रकारामुळे त्याने हा प्रकार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

शनिवारी सायंकाळी राजेंद्र बाळासाहेब जाधव (४०) यांची शेजारी राहणाऱ्या आत्या सत्यभामाबाई दगडू जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे घरातील पत्नी शेजारी मुलांसह रात्रभर तिकडेच थांबल्या. आज सकाळी मृत आत्याचा अंत्यविधी होणार होता. सकाळ झाली म्हणून घरात माघारी फिरलेल्या त्यांच्या पत्नीला राजेंद्र यांचा गळफास घेतलेला व लटकलेला अवस्थेत मृतदेह दिसला हे बघून त्यांनी आरडाओरड केली. एकीकडे आत्याच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतांनाच राजेंद्र यांचे प्रेत बघून पोलिस पाटीलांनी हि बाब पोलिसांना कळविली.

दरम्यानच्या काळात मृत राजेंद्र जाधवचा मृतदेह नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनसाठी पाठविण्यात आला. सावरगावात राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याच्या मागे एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीच्या हृदयाच्या झडपांचा आजार असून नुकतीच शस्त्रक्रिया देखील झाली होती व दररोज होणारा औषधोपचार त्यांना परवडत नव्हता. मयत राजेंद्र यांची शेती असून त्यांच्यावर सततच्या नापिकीमुळे कर्जाचा बोझा होता, मात्र तो किती होता हे कळू शकले नाही.

Web Title: farmer suicide in Nashik Nandgaon

टॅग्स