मजुरांअभावी शेतकऱ्यांची होतेय कसरत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

मजुरांअभावी शेतकऱ्यांची होतेय कसरत

कापडणे (जि. धुळे) : पावसाळा तोंडावर आला आहे. मृग नक्षत्र सुरु व्हायला अवघे तीन आठवडे शेष आहेत. बागायतदार शेतकऱ्यांची उन्हाळी हंगाम आवरण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यात उकाडा चांगला जाणवत असून, तापमान ४२ अंशांच्या पार गेले आहे. वाढते तापमानात पुरेसा मजूर वर्ग उपलब्ध होत नसल्याची स्थिती असून, मजूर वर्ग उन्हामुळे सकाळपासूनच शेतात राबत असल्याचे दिसत आहे. मका, भुईमूग, बाजरी, डाळी काढणी करण्याची लगबग सुरु झाली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने, शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या उभी ठाकली असून, पाऊस आल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता आहे. मजुरांअभावी काढणी उशिरा होणार असल्याची चिन्हे असून, काढणी नंतर शेतीची मशागत करण्यास शेतकऱ्यांना वेग द्यावा लागणार आहे.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यात मराठी नामफलकाचा अधिनियम लागू


पावसाचे येत्या पंधरा ते वीस दिवसात आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना मृग नक्षत्राची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे बागायतदार शेतकऱ्यांना पुरेशा मजुरांअभावी हंगाम आवरण्याची कसरत करावी लागत आहे. मका, भुईमूग, बाजरी काढणी अंतिम टप्यांत आली आहे. कांदा काढणीस वेग आला आहे. कांद्याला समाधानकारक भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्यास शेतकरी प्राधान्य देत असल्याचे चित्र असून, ज्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सोय नाही. ते न परवडणाऱ्या भावातही नाइलाजास्तव कांदा विक्री करीत आहेत.

हेही वाचा: Youtube पाहून तो घरातच छापायचा बनावट नोटा; हिंगणेच्या तरुणाचा प्रताप

''इतर बागायती पिकांपेक्षा मक्याचे उत्पादन परवडते. पेरणीपासून काढणीचा खर्च कमी आहे. यावर्षी भावही बऱ्यापैकी आहे. गुरांसाठी चाऱ्याची मुबलकता उपलब्ध होते.'' - भटू पाटील, बागायतदार शेतकरी

Web Title: Farmers Are Struggling Due To Lack Of Labor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top