केळीच्या भावात ऐन रमजान पर्वात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल | jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

low price of banana

केळीच्या भावात ऐन रमजान पर्वात घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल

रावेर (जि. जळगाव) : गेल्या पंधरा दिवसात केळीची कापणी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने केळीचे भाव २०० ते ६०० रुपये क्विंटलनी कमी झाले आहेत. ऐन रमजान महिन्यात केळीची मागणी वाढलेली असताना अनाकलनीय रीतीने केळीचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मार्चअखेर बाजार समितीने जाहीर केलेले केळीचे भाव १४२० रुपये क्विंटल असे होते आणि तितके भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळत होते. मात्र रविवारी (ता. १७) ते टप्याटप्याने घसरून १२२५ रुपये आणि सोमवारसाठी (ता. १८) १२०० रुपये क्विंटल असे आहेत. बाजार समितीच्या फलकावर केळीच्या भावातील घसरण ही फक्त २०० रुपये क्विंटलची दिसत असली तरी प्रत्यक्षात केळी ७०० ते ९०० रुपये क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. म्हणजे प्रत्यक्षात केळीच्या भावातील घसरण ही ५०० ते ६०० रुपये क्विंटल इतकी आहे.

हेही वाचा: नाशिकच्या कलिंगडांचा परराज्यात डंका; यंदा किलोचा भाव 11 रुपये

रमजान महिन्यात केळीच्या झालेल्या भावातील घसरणीबाबत माहिती घेतली असता, वाढत्या उन्हामुळे केळीच्या कापणीत झालेली वाढ हे कारण समोर आले आहे. रावेर- यावल तालुक्यातून ट्रकद्वारे होणाऱ्या उत्तर भारतातील वाहतुकीत फारशी वाढ झाली नसली तरी रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात केळी वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. कडक ऊन पडत असल्याने आणि त्यातही भारनियमन वाढल्याने केळीचे घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच पूर्वीपेक्षा कापणी योग्य केळी मोठ्या प्रमाणात निघत आहे. यामुळे केळी कापण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे घाई-पाठपुरावा केला जात असल्याने देखील केळीच्या भावात घसरण होत असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: Video: कारंजात तुरीच्या दराची नरमाई

बाजारपेठेत आंबा अजूनही मोठ्या प्रमाणावर आलेला नाही. अन्य फळांची आवकही नोंद घेण्यासारखी नाही. तरीही भाव घसरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजार समितीत तर केळीचा किमान ४०० रुपये क्विंटल इतक्या कमी भावात लिलाव होत असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: विकेल ते पिकेल अभियान यशस्वी; मालेगावची कलिंगडे काश्मिरला रवाना

Web Title: Farmers Are Worried Due To Bananas Price Fallen On The Ramadan In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top