शेतकऱयांनी श्रमदानातून उपसला सुळे डाव्या कालव्यातील मातीचा ढिगारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

खामखेडा (नाशिक ) - पावसाळयात हक्काचे पूरपाणी कालव्याला मिळेल या आशेवर खामखेडा येथील सरपंच,ग्रामपंचायत सद्ष्य व सत्तर ते ऐंशी  तरुणांनी सुळे डावा कालव्यात एक दिवस श्रमदान करत कालव्यातील मातीचा ढिगारा पाटी फावड्याने उपसत पाण्यासाठी काही पण .....ह्या म्हणीचा प्रत्यय सत्यात उतरवत कडवा धरण उपविभागाच्या अधिकार्यांना सहकार्य करत आदर्श घालून दिला.

खामखेडा (नाशिक ) - पावसाळयात हक्काचे पूरपाणी कालव्याला मिळेल या आशेवर खामखेडा येथील सरपंच,ग्रामपंचायत सद्ष्य व सत्तर ते ऐंशी  तरुणांनी सुळे डावा कालव्यात एक दिवस श्रमदान करत कालव्यातील मातीचा ढिगारा पाटी फावड्याने उपसत पाण्यासाठी काही पण .....ह्या म्हणीचा प्रत्यय सत्यात उतरवत कडवा धरण उपविभागाच्या अधिकार्यांना सहकार्य करत आदर्श घालून दिला.

कळवण तालुक्यातील सुळे पिपळे गावाजवळील सिद्धेश्वर धरणापासून सुळे डावा कालव्याच्या पुढे दोनतीनशे फुटाजवळ दोन्ही बाजूस असलेल्या टेकड्यांवरील मातीचा ढिगारा कालव्यात पडल्याने व ह्या ठिकाणी सिमेंटचे बॉक्स असल्याने व एका बाजूला खोलगट दरड असल्याने या ठिकाणी जेसीपी अथवा इतर यंत्र टाकता येणार नसल्याने ह्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून कालव्यातील अडकलेली माती काढणे गरजेचे होते.

कडवा धरण उपविभागाकडे कालवा दुरुस्ती साठी निधीच उपलब्ध नसल्याने व येन पावसाळ्याच्या तोंडावर कालव्यातील माती काढण गरजेच असल्याने.सरकारी काम अन वर्ष भर ठाम ह्या उक्ती प्रमाणे संबंधित उपविभागाच्या भरवश्यावर राहिल्यावर या वर्षी कालव्यातून पाणीच मिळणार नसल्याने खामखेडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत माती काढण्याचे ठरवले.

कालव्यात मोठ्या प्रमाणात माती, दगड, गोटे पडल्याने या कालव्यात पाणी सोडल्यास पाणी पाटातून पुढे जाने शक्य नव्हते.पावसाळ्यात धरणातील पूर पाणी या पाटात सोडले तर खामखेडा व सावकी गावातील नागरिकांना पाणी मिळेल या आशेवर खामखेडा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत चर्चा करत सत्तर ते ऐंशी युवक ग्रामस्थ ,शेतकरीनी  घरच्या भाकरी बांधून स्वतः वाहने करत कालव्यातून माती दगडगोटे काढत श्रमदानातून एका दिवसात पाटातील माती काढली.

पावसाळ्यात या कालव्यात पुरपाणी सोडताना अडचण येईल म्हणून आम्ही सर्व शेतकऱयांनी कोणत्याही मोबदलाची अपेक्षा न करता पाटात पडलेली सर्व माती काढली.
- बापू शेवाळे,उपसरपंच खामखेडा

श्रमदानातून खामखेडा येतील ८० ग्रामस्थांनी कालव्यातील मातीचा ढिगारा उपसल्याने विभागास फायदा झाला असून ह्या पावसाळ्यात जास्तीस जास्त पूरपाणी खामखेडा ग्रामस्थांना देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- डी इ बाविस्कर

 

Web Title: Farmers get relief from labor: Uprooted soil in the left canal