सरकारच्या निष्क्रिय धोरणांनी बळीराजा देशोधडीला - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

अमळनेर - 'सरकारच्या निष्क्रिय धोरणांमुळे देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणारा बळीराजा देशोधडीला लागला आहे', अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटिल यांनी आज येथे केली. शेतकरी सुकाणू समितीची जनजागरण यात्रेचे अमळनेर पैलाड येथे राष्ट्र सेवादल व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांतर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते. चोपडानाक्यावरील स्वातंत्र आंदोलनातील आत्मसमर्पण करणाऱ्या सैनिक स्तंभास शेतकरी जागरण यात्रेतर्फे पुष्प अर्पण करण्यात आले.

शेतकरी संघटनांची सुकाणू समितीची जनजागरण यात्रेचे अमळनेर पैलाड येथे राष्ट्र सेवादल व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्ते संदिप घोरपडे, भारती गाला, रणजित शिंदे, संजय पाटिल, जगदीश तावडे, रणजित पाटील आदिंनी पुष्पगुच्छ देऊन रघुनाथदादा पाटिल व मान्यवर शेतकरी नेत्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलतांना लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी लोकसंघर्ष करण्याकरीता निर्धार लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. कॉम्रेड किशोर ढमाले यांनी ही संपूर्ण कर्जमुक्ती व विजबिलमुक्ती झाली पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविकात संदिप घोरपडे यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी संघटितपणे लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन करताना भारती गाला यांनी शेतीमाल उत्पादन खर्च व नफा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन संजय हरी पाटिल यांनी केले. याप्रसंगी कालिदास आपटे, सतीश देशमुख, सुभाष काकूस्ते, शिवाजी नांदखिले, गणेशकाका जगताप आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. सदरची जनजागरण यात्रा पैलाड, फारशी पूल, मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गिरणी कामगार हुतात्मा स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, पु. सनेगुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत शहरातून बाजारपेठ, स्टेशनरोड मार्गे सदर फेरी काढण्यात आली होती.यात जनजागरण करणारे फलक व ध्वनिफीत वाजवीत जाणाऱ्या वाहनाचा मोठा ताफा सहभागी होता. क्रांतिसिंह नाना पाटिल यांच्या सांगलीतील इस्लामपूर पासूनते शेतकऱ्यांचा आसूड लिहीणाऱ्या महात्मा फुले यांच्या वाडात सदरच्या यातत्रेचा समारोप होणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. 
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
Web Title: Farmers union leader Raghunathdada patil criticized BJP government