मेहुणबारे येथील प्रौढाचा उष्माघाताने मृत्यू

दीपक कच्छवा
रविवार, 6 मे 2018

तालुक्यात उष्णतेची लाट वाढली असून, दिवसेंदिवस पारा वाढत आहे. लग्नसोहळा आटोपून घराकडे येताना मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील प्रौढाचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव पुलावर दुपारी तीनच्या सुमारास घडली.

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) : तालुक्यात उष्णतेची लाट वाढली असून, दिवसेंदिवस पारा वाढत आहे. लग्नसोहळा आटोपून घराकडे येताना मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील प्रौढाचा उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव पुलावर दुपारी तीनच्या सुमारास घडली. दरम्यान हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) येथील बापूराव देवराम साळुंखे ( वय 55) हे लग्न सोहळ्यासाठी चाळीसगावला गेले होते. लग्नसोहळा आटोपून घराकडे दुचाकीवरून परतताना अचानक चक्कर आली आणि ते रस्त्याच्या कडेला जाऊन खाली पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीनला चाळीसगाव पुलावर घडली.

Web Title: Fatality of adult deaths in Mehunabara