Dhule Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने मुलाकडून बापाची निर्घृण हत्या
esakal

Dhule Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने मुलाकडून बापाची निर्घृण हत्या

Published on

Dhule Crime News : घरगुती कारणावरून पुत्र व सुनेच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या पित्याला जीव गमवावा लागल्याची घटना साबरसोंडा (ता. साक्री) येथे घडली.

भांडणात सूनबाईस राग आल्याने ती घरातून निघून गेली. याचा राग आलेल्या मुलाने पित्याच्या डोक्यात लोखंडी पहार टाकून त्यांचा खून केला. (Father killed by son with iron guard dhule crime news)

साबरसोंडा येथे पित्याची हत्या करणाऱ्या पुत्राला पोलिसांनी तत्काळ अटक केली. प्रकाश श्यामराव जगताप (वय ४२) असे त्याचे नाव आहे.

२ ऑगस्टला रात्री अकराच्या सुमारास प्रकाश जगताप याचे घरगुती कारणावरून पत्नीसोबत भांडण सुरू असताना वडील श्यामराव भिवसन जगताप (वय ६५) मुलास समजावण्यासाठी गेले. त्या वेळी त्याने रागाच्या भरात घरातील जुनी लोखंडी पहारीने वडिलांच्या डाव्या कानावर वार केला. त्यात श्यामराव जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम पथकासह घटनास्थळी पोचले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने मुलाकडून बापाची निर्घृण हत्या
Dhule Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल चौकशीचा आदेश

याबाबत कलीबाई श्यामराव जगताप यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिस ठाण्यात प्रकाश जगताप याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ शोध घेऊन संशयित प्रताप याला गावातून अटक केली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्रीचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, रोशन निकम, गणेश कोळी, प्रसाद रौदळ, राजू जाधव, उमेश चव्हाण, रामलाल अहिरे, संजय शिरसाट, शांतिलाल पाटील, तुषार जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

Dhule Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने मुलाकडून बापाची निर्घृण हत्या
Dhule Crime News : स्वर्ण पॅलेसमध्ये चोरी; पोलिसांतर्फे ‘टॅटू’वरून गुन्ह्याची उकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com