जन्मदात्यानेच पाजले मुलांना विषारी औषध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

रोगर देण्याचा प्रयत्न
बोराडेने गोठ्यातील कीटकनाशकाची बाटली आणली. त्याने निकिताला पकडून तिच्या तोंडात ‘रोगर’ हे कीटकनाशक पाजण्याचा प्रयत्न केला. तिला सोडविण्यासाठी भाऊ धावला. त्या वेळी बोराडेने त्यालाही पकडून रोगर ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी जमलेल्या लोकांनी बोराडेला घराबाहेर नेले.  याप्रकरणी बोराडेस अटक केली आहे.

नाशिक - मद्यपी जन्मदात्यानेच मुलगा व मुलीला बळजबरीने विषारी कीटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिंदेगावात घडली. संशयिताच्या मुलीने त्याच्याकडे शालेय वस्तू खरेदीसाठीचा आग्रह धरला होता. 

पंढरीनाथ बाबूराव बोराडे (४८, रा. माणिक चौक, शिंदेगाव) असे संशयित बापाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री बोराडे हा नशेमध्ये घरी आला. त्या वेळी त्याच्या बारावीत शिकणाऱ्या निकिता या मुलीने गणवेश आणि वह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मुलांच्या शिक्षणालाच विरोध असलेल्या बोराडेला त्याचा राग आला. त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Poison Son Daughter Crime