मुलाला कष्टातून पीएसआय पदापर्यंत पोचविणाऱ्या मातेचा सत्कार

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 2 मे 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : संजयनगर, जैताणे (ता. साक्री) येथील विधवा महिला कल्पनाबाई केशव माळी यांनी डोक्यावर भाजीपाला विकून आपल्या मुलाला पीएसआय पदापर्यंत पोहचविले. त्यानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जैताणे ग्रामपंचायत व तनिष्कांतर्फे कल्पनाबाईंसह त्यांच्या मातोश्री गोकुळबाई व मुलगा नितीन यांचा शाल, श्रीफळ देऊन दोन्ही गावांतून पहिलाच सत्कार करण्यात आला.

तनिष्कांतर्फे तनिष्का समन्वयिका मोहिनी जाधव, तनिष्का तथा जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरे यांनी, तर ग्रामपंचायतीतर्फे सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांनी त्यांचा सत्कार केला. जितेंद्र केशव माळी हा पितृछत्र हरपलेला युवक सन २००८ साली जिद्दीने व मेहनतीने नाशिक पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर सन २०१६/१७ मध्ये झालेल्या खात्यांतर्गत पीएसआय पदाच्या परीक्षेत नुकताच तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्रच्या आई, आजी व भावाचा सत्कार करण्यात आला. सरपंच संजय खैरनार, उषाबाई ठाकरे, मोहिनी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जितेंद्रचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा नागरी सत्कार करण्याचा मानस सरपंच खैरनार यांनी व्यक्त केला. तर गरिबीतून आपल्या मुलाला व नातवाला शिकविणाऱ्या अनुक्रमे कल्पनाबाई व गोकुळबाई यांचे उषाबाई ठाकरे व मोहिनी जाधव यांनी तनिष्कांतर्फे कौतुक केले.

Web Title: felicitation of Mothers reaching to PSI rank