Fertilizer Price
sakal
धुळे: नैसर्गिक संकटांमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या बळीराजावर आता रासायनिक खतांच्या दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. सततचा पाऊस आणि अवकाळीमुळे खरीप हंगामात मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. आरसीएफ, महाधन आणि क्रॉपटेकसारख्या कंपन्यांच्या विविध ग्रेडच्या खतांच्या किमतीत प्रति पोते १०० ते २०० रुपयांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.