Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यात शेतकरी मजुरांमध्ये फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला; खर्चही काढणे अवघड

तळोदा तालुक्यात उशिराने लागवड करण्यात आलेल्या कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे.
A farm laborer picking cotton in a field in Ranzani
A farm laborer picking cotton in a field in Ranzaniesakal

Nandurbar News : तळोदा तालुक्यात उशिराने लागवड करण्यात आलेल्या कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांना अर्ध्या हिस्स्यावर कापूस द्यावा लागत आहे.

त्यामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये वाटणी होत असल्याने शेतकऱ्यांना कापूस प्रतिक्विंटल तीन हजार रुपये पडत असल्याचे सांगण्यात येत असून, या पिकाला लागलेला खर्चही काढणे अवघड झाल्याचे बोलले जात आहे. (Fifty Fifty Formula Among Farm Labourers difficult to calculate cotton crop sowing cost Nandurbar News)

तळोदा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात उशिरा पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, चिनोदा, रोझवा, प्रतापपूर व इतर परिसरात उशिराने कापसाची लागवड करण्यात आली होती.

दरम्यान, उशिराने लागवड करण्यात आलेल्या कापसाची वेचणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांना अर्ध्या हिस्स्यावर कापूस द्यावा लागत आहे.

त्यामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये वाटणी होत असल्याने शेतकऱ्यांना कापूस प्रतिक्विंटल तीन हजार रुपये पडत असल्याचे सांगण्यात येत असून, या पिकाला लागलेला खर्चही काढणे अवघड होऊन बसले आहे.

A farm laborer picking cotton in a field in Ranzani
Nashik Agriculture News: राज्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात घट! ऊसतोडणी मजुरांची टंचाई

दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बीची तयारी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे.

त्यामुळे जेवढा येईल तेवढा कापूस काढून त्या शेताची मशागत करून गहू, बाजरी, मका, हरभरा यांसारखी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

यामुळे फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, बियाणे, लागवड, मजुरी, खते, फवारणी, वेचणी या सर्वांची बेरीज करता कापूस पिकात त्यांना काहीही आर्थिक लाभ होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

A farm laborer picking cotton in a field in Ranzani
Agriculture: अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाची विशेष योजना, कृषी विभागाकडून मिळणार या सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com