Nashik Agriculture News: राज्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात घट! ऊसतोडणी मजुरांची टंचाई

राज्यात आठ विभागांतील ९६ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरू आहे.
Sugarcane crop worker
Sugarcane crop workeresakal

मालेगाव : राज्यात आठ विभागांतील ९६ सहकारी व ९९ खासगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरू आहे. २८ डिसेंबरअखेर राज्यात ३५६.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत ४४६.५७ लाख क्विंटल उत्पन्न झाले होते. या वर्षी ९०.३९ लाख क्विंटल उत्पादनात घट झाली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात ऊस खूपच कमी आहे. या चर्चेमुळे राज्यातील ऊसतोडणी कामगार गुजरात, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर गेले आहेत. याचा फटका बहुतांश साखर कारखान्यांना बसत आहे.

ऊस असूनही वेळेवर तोडणी होत नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. याचाच परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. (Decrease in sugar yield compared to last year in state Shortage of sugarcane workers Nashik Agriculture News)

राज्यात गेल्या वर्षी १०२ सहकारी व ९९ खासगी असे एकूण २०१ कारखाने सुरू होते. २८ डिसेंबरपर्यंत या कारखान्यांमधून ४७८.९४ लाख टन उसाचे गाळप होऊन ४४६.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सहा सहकारी साखर कारखाने बंद झाले. १९५ कारखान्यांमधून ४०२.८४ लाख टन उसाचे गाळप होऊन ३५६.१८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यावर्षी ऊसतोडणी कामगारांचा प्रश्‍न सर्वच कारखान्यांना भेडसावत आहे.

वेळेवर ऊसतोड होत नसल्याचा फटका उसाचे वजन घटण्यावर व साखर उताऱ्यावर होत आहे. गेल्या वर्षी साखर उतारा ९.३२ होता. या वर्षी तो ८.८४ वर आला आहे.

कोल्हापूर वगळता एकही विभागाचा साखर उतारा दहापेक्षा अधिक नाही. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने गळीत हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. पुरेसे काम मिळेल की नाही, या शक्यतेने बहुतांश ऊसतोडणी कामगार गुजरात, कर्नाटकमध्ये गेले.

शेतात ऊस उभा आहे. शेतकरी कारखान्यांकडे ऊस गाळपाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र ऊसतोडणी कामगारांअभावी कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. सध्या हंगाम मध्यावर आला आहे.

अशा परिस्थितीत ऊसतोडणी कामगार उपलब्ध करणे अवघड आहे. त्यातच ऊसतोडणी यंत्र ठराविक भागातच काम करू शकते. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात उसाची तशा पद्धतीने लागवड केलेली नाही. हंगाम अजून तीन ते चार महिने आहे.

Sugarcane crop worker
Nashik Agriculture News : ‘रब्बी’तला बागायतदारांचा जिल्हा हिरमुसला; 59 टक्के पेरणी

ऊसतोडणी कामगारांअभावी उसाचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो. दुष्काळी परिस्थिती असली तरी सर्व ऊस गाळप करण्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. एकूणच गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी उत्पन्नात घट निश्‍चित मानली जात आहे.

"राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना उत्पादित साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ती हजार १०० रुपयांवरून तीन हजार ४०० रुपये केले आहे. प्रतिक्विंटल उचल ८५ टक्क्यांवरून ९० टक्के केली आहे. याचा फायदा कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांनाही होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखानदारांनी ठरलेली एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर अदा करावी. अपुरा ऊस पुरवठा तसेच ऊसतोडणी मजुरांच्या कमतरतेमुळे अनेक कारखाने कसेबसे सुरू आहेत. शेतकऱ्यांचा सर्व ऊसगाळप केला जाईल. यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे."- कुबेर जाधव समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

"राज्यात ऊस कमी असल्याच्या चर्चेमुळे ऊसतोडणी मजूर परराज्यात गेले. पुरेसा ऊस आहे. परंतु तोडणी कामगार नाहीत, अशी परिस्थिती आहे. ऊसतोडणी यंत्राचा वापर ठराविक ठिकाणीच होतोय. सर्वच कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांची समस्या भेडसावत आहे. मजुरांअभावी क्षमतेएवढा ऊस कारखान्यांना मिळत नाही. वेळेवर ऊसतोडणी होत नसल्याने उसाचे वजन घटून साखर उतारा कमी होत आहे."- बबनराव गायकवाड अध्यक्ष, एसजे शुगर, रावळगाव

Sugarcane crop worker
Agriculture: अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाची विशेष योजना, कृषी विभागाकडून मिळणार या सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com