मालेगावी पावसासाठी 50 हजार मुस्लीम बांधवांचे नमाज-ए-इश्‍तिस्का

प्रमोद सावंत 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

शहरातील इदगाह मैदानावर मंगळवारी (ता. 7) पावसासाठी नमाज-ए-इश्‍तिस्का (नमाज पठण) अदा करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना मौलाना मुफ्ती यांनी हे आवाहन केले. शहरातील पन्नास हजार मुस्लीम बांधवांनी पावसासाठी नमाज पठण केले.

मालेगाव : 'पाणी है तो गाव है, शहर है, मुल्क है... पाणी हर जानदार की जिंदगी है... जहाँ पाणी कम हुआ, लोग वो गाव छोड गये... मोबाईल आैर सोशल मिडीया से समाज में बुराई बढ रही है । उसे दूर करने की जरुरत है. रमजान में जकात पुरी नही दी गयी । नाप-तोल में कमी हो गयी. सभी जगह चोरी बढ गई. उसी वजह से बारीश थम गई है । इन्सान में खुद का जायजा (आत्मपरिक्षण) लेना चाहिए ।' असे आवाहन मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी मंगळवारी येथील इदगाह मैदानावर केले.

शहरातील इदगाह मैदानावर मंगळवारी (ता. 7) पावसासाठी नमाज-ए-इश्‍तिस्का (नमाज पठण) अदा करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना मौलाना मुफ्ती यांनी हे आवाहन केले. शहरातील पन्नास हजार मुस्लीम बांधवांनी पावसासाठी नमाज पठण केले. यावेळी झालेल्या दुवाप्रसंगी वरुणराजाला साकडे घालण्यात आले. त्याचवेळी देशातील दहशतवाद, आतंकवाद व जातीयवाद संपुष्टात यावा यासाठीही दुवा करण्यात आली. मौलाना मुफ्ती यांनी नमाज पढविली. गेल्या शुक्रवारी शहरातील सर्व मशिदीतून पावसासाठी मंगळवारी नमाजपठण होणार असे आवाहन करण्यात आले होते. शहरवासियांनी त्यास प्रतिसाद दिला. शहराच्या विविध भागातून सकाळी नऊपर्यंत अबालवृध्द नमाज पठणासाठी अाले. या काळात कॅम्प रस्त्याकडे येणारे मार्ग लोखंडी बॅरीकेटींग लावण्यात आल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शहरातील बडा कब्रस्तानमध्ये काल सोमवारी रात्री पावसासाठी दुवा करण्यात अाली. मौलाना इम्तियाज यांनी नमाज व दुवा पठण केले. यावेळी शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. तालुक्यावर वरुण राजा रुसला असून पाऊस पडावा यासाठी नमाज पठण, मंदिरात जलाभिषेक व ग्रामीण भागात धोंडी धोडी पाणी देचा गजर सुरु आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fifty Thousand Muslim People Did Namaj Pathan For Rain At Malegaon