सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष  - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मालेगाव - शेतकरी कधी संपावर गेला होता का? उत्तर प्रदेश सरकारने 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. राज्य शासनाला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यासाठी 30 हजार 500 कोटींची तरतूद करता आली नाही. कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची गॅरंटी मागणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची, मनाची काही आहे का? अशी घणाघाती टीका करतांनाच शेतकऱ्यांची कच्ची- बच्ची उघड्यावर पाडणाऱ्या सरकारच्या विरोधात संघर्षासाठी व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र आलो. सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या मागणीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे नाशिक जिल्ह्यात आज आगमन झाले. यानिमित्त मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर आज झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, शेतकऱ्यांपाठोपाठ त्यांची मुलं- बाळे आत्महत्या करीत आहेत. सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे. आता काही निवडणुका नाहीत. फक्त कर्जमाफी यासाठीच हा संघर्ष सुरू आहे. विरोधी पक्षात असताना सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता का गप्प आहेत, असा सवाल करतानाच कर्जमाफी द्यावीच लागेल, असे ते म्हणाले. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफी हे संघर्ष यात्रेचे एकच ध्येय आहे. आता लग्न, कार्य यापेक्षा सर्वांत मोठे कार्य कर्जमाफी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हे आहे. भांडवलदारांना कर्जमाफी व देशाचा पोशिंदा शेतकरी फासावर जात असताना सरकार शांत आहे. खासदाराच्या विमान प्रवासासाठी मंत्र्यांच्या अंगावर धावून जाणारे शिवसेना खासदार कर्जमाफीसाठी अर्थमंत्री, कृषिमंत्र्यांच्या अंगावर का धावून जात नाहीत? शिवसेनेला शेतकऱ्यांचा बेगडी कळवळा आहे, असा आरोप त्यांनी केला. 

Web Title: Fight until satabara not blank