अश्निनीच्या स्वप्नांना समको बँकेने दिले बळ

रोशन खैरनार
रविवार, 22 जुलै 2018

सटाणा : अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात मोठे यश मिळविणाऱ्या अश्विनी अहिरराव हिच्या शिक्षणाची तळमळ बघून सर्वच स्तरातून तिला मदतीचा ओघ सुरु आहे. येथील सटाणा मर्चंट्स को - ऑपरेटीव्ह बँकेतर्फे काल शनिवार (ता.२१) रोजी सायंकाळी सर्व संचालक, सेवक व अल्पबचत प्रतिनिधींनी देणगीरुपात संकलित केलेल्या ३१ हजार रुपयांची भरीव मदत अश्विनीला देण्यात आली. 

बँकेचे संचालक दिलीप चव्हाण यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व संचालक, सेवक व अल्पबचत प्रतिनिधींनी ही मदत संकलित केली होती. अश्विनीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते तर वडील मुकुंद अहिरराव हे शिवणकामासोबत समको बँकेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून नाममात्र मानधनावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने दहावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण मिळवून जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. पुढील महागडे शिक्षण घेणे अश्विनीला परवडणारे नसल्याने शिंपी समाजासह शहरातील विविध सेवाभावी संस्थांतर्फे अश्विनीला मदतीचा ओघ सुरु आहे. 

आज समको बँकेच्या सभागृहात अध्यक्ष राजेंद्र अलई व उपाध्यक्षा कल्पना येवला यांच्या हस्ते अश्विनीचा सत्कार करून रोख स्वरुपात मदत देण्यात आली. यावेळी संचालक यशवंत अमृतकार, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, रुपाली कोठावदे, कैलास येवला, जयवंत येवला, किशोर गहीवड, डॉ. विठ्ठल येवलकर, प्रवीण बागड, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला, रमण अहिरराव आदींसह बँकेचे सर्व सेवक व अल्पबचत प्रतिनिधी उपस्थित होते. प्रवीण शिरोडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. 

Web Title: Financial assistance of Rs 31 thousand to Ashwini from Samo Bank