सिन्नर येथे औद्योगिक वसाहतीत आग

राजेंद्र अंकार
शनिवार, 20 एप्रिल 2019

सिन्नर (नाशिक) : सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील जनार्दन फ्युएल या जुन्या टायरपासुन ऑईल बनविणाऱ्या कंपनीच्या टायर ठेवलेल्या जागेत मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली.या आगीत रॉ मटेरियल असलेल्या टायरला ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात आले.

कंपनीने संचालक रमेश माळी यांनी या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे 'सकाळ'ला सांगितले. आग विझवण्यासाठी सिन्नर, संगमनेर, नाशिक,एमआयडीसी, इंडीयाबुल्स येथुन सहा अग्निशामक गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत असुन ७० टक्के आग विझवण्यात यश आले आहे.पहाटे साडेतीनला लागलेल्या आगीबाबत सकाळी दहावाजेपर्यंत एमआयडीसी पोलिसांना खबर नव्हती.हाकेच्या अंतरावर पौलिस ठाणे आहे.

Web Title: fire at sinnar industrial area