‘विघ्नहर्ता’मध्ये धुळ्यातील पहिली बायपास शस्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

धुळे - बायपास शस्त्रक्रिया करायची म्हटली म्हणजे मुंबई, पुण्यालाच जावे लागणार असा खानदेशातील रुग्णांचा आतापर्यंतचा अनुभव. पण, येथील श्री. विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा आता उपलब्ध झाली आहे. येथील डॉक्‍टरांनी धुळ्यातील पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली आहे. येत्या काळात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करण्याचा मानस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी व्यक्त केला.

धुळ्यातील पहिल्या बायपास शस्त्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी श्री. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी आज सायंकाळी पाचला हॉस्पिटलमध्येच (राणाप्रताप कॉलनी, जुने चिरंतन हॉस्पिटल, देवपूर धुळे) पत्रकार परिषद घेतली. बायपास शस्त्रक्रिया करणारे ह्रदय शल्यविशारद डॉ. यतीन वाघ तसेच डॉ. मनोज पटेल, डॉ. तुकाराम पाटील, डॉ. सुबोध पाटील, डॉ. विकास राजपूत, डॉ. योगेश झाडबुके, डॉ. हेमकांत पाटील, डॉ. पुनीत पाटील, डॉ. मुकेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

पहिली शस्त्रक्रिया यशस्वी
ह्रदयविकाराबरोबरच फुफ्फुसाचा दुर्धर आजार असलेल्या ६५ वर्षीय अनसूयाबाई गवळे (रा. खुडाणे, ता.साक्री ) यांच्यावर २२ डिसेंबरला श्री. विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. वाघ यांनी ही शस्त्रक्रिया केली. श्रीमती गवळे यांची प्रकृती चांगली असून त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येणार आहे. याशिवाय मुरलीधर पाटील (तासखेडा, ता.अमळनेर) यांच्यावरही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. मुंबई, पुण्याच्या तुलनेत माफक दरात या शस्त्रक्रिया झाल्याचेही डॉक्‍टरांनी सांगितले.

अवयव प्रत्यारोपणाचा प्रयत्न
ह्रदय प्रत्यारोपण, किडनी, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधाही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्याचा मानस आहे. ह्रदय प्रत्यारोपण केंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्तावही सादर केल्याचे उपस्थित डॉक्‍टरांनी सांगितले.

गरजू रुग्ण दत्तक, उद्या शिबिर
श्री. विघ्नहर्ता हॉस्पिटलने किडनीचा दुर्धर आजार असलेल्या सरला सूर्यवंशी या गरजू रुग्णाला मोफत औषधोपचारासाठी दत्तक घेतले आहे. दरम्यान, उद्या (ता.६) पत्रकार दिनाचे औचित्य साधून हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी व उपचार शिबिर घेण्यात येणार आहे.

Web Title: first bypass surgery vighnaharta hospital in dhule