शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तकांचे नियोजन

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तकांचे नियोजन

खामखेडा (नाशिक) : शासनाकडून दरवर्षी पहिली ते आठवी पर्यंत मोफत पाठ्यपुसते वितरीत केली जातात.यावर्षी हि देवळा तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या मराठी माध्यमाच्या १९१८० विध्यार्थ्यांनातर सेमी इंग्रजीच्या ९२०१विध्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके  देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गट स्तरावरून थेटशाळेच्या पहिल्याचदिवशी विध्यार्थ्यांच्या  हातात पुस्तके देण्याचे नियोजन  झाले असल्याचे देवळा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव यांनि सांगितले.  

चालू वर्षी गटस्तरावर आत्तापर्यंत पन्नास टक्के मराठी व सेमी माध्यमाचे पुस्तके प्राप्त झाले आहेत.माघील शैक्षणिक वर्षापासून गटावरून थेट शाळेत पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे.देवळा तालुक्यातून मराठी माध्यमासाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत १९१८० पुस्तक संच संख्या लागणार आहे.

तालुक्यासाठी इयत्तानिहाय लागणारी पुस्तक संख्या:पहिली २१०७ , दुसरी २१०७,तिसरी २२५१ ,चौथी २२७५,पाचवी२२८४ ,सहावी२७०२,सातवी २७३६,आठवी२७१८ अशी मागणी विभाग स्तरावर करण्यात आली होती. पैकी विभागीय स्तरावरून पन्नास टक्के पुस्तके तालुकास्तरावर  प्राप्त झाली आहेत.व ह्या आठवड्या भरात इतर सर्व पुस्तके उपलब्ध होत शाळा पर्यंत पोहोच होणार आहेत.          

सेमी इंग्रजी माध्यमासाठी 
पहिली १४५४, दुसरी१४३७,तिसरी १४३३,चौथी १०२८,पाचवी १०५३,सहावी १००९,सातवी ८८७,आठवी ९००या माघील वर्षी प्रमाणे ह्या वर्षीहि स्टेट को-आप कन्झुमर्स फेडरेशन लि मुंबई यांच्या कडून थेट विभाग स्थरावरून ते गट स्थरावर पुस्तकांचे  वितरण होत आहे.त्यामुळे आजपावेतोची वितरण प्रणालीत बदल होत विभागावरून थेट तालुक्यावर पुस्तके उपलब्ध झाली आहेत. व तालुका स्तरावरून थेट शाळेवर पुस्तके मिळणार आहेत.

पुस्तके वाह्तुकीचा खर्च मुख्यध्यापकाच्या खात्यावर थेट वर्ग केला जाणार आहे. देयके सादर करून ही मागणी करता येणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव यांनी  सांगितले.

देवळा तालुक्यात चार बीट आहेत ह्या चार बिटातून आठ केंद्र असून तालुक्यातील एकशे सतरा प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा, आश्रमशाळा सुरु होण्यापूर्वी पुस्तकांची वितरण व्यवस्ता  लावण्याचे नियोजन गटशिक्षण अधिकारी सतिश बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी विजया फलके, नंदू देवरे,एल व्ही सूर्यवंशी व केंद्रप्रमुख करत असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने  गटशिक्षनाधिकारी बच्छाव यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com