सोळावी जनगणना...अन् तीही ऍपद्वारे?

Census-2021-1-696x364.jpg
Census-2021-1-696x364.jpg

नाशिक : सोळाव्या जनगणनेसाठी महापालिकेने तीन हजार 500 प्रगणक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, प्रथमच ऍपद्वारे जनगणना केली जाणार आहे.
जनगणनेसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रधान जनगणना अधिकारी, तर प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांची जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

जनगणनेची थीम 'लोकसहभागातून जनकल्याण'

2011 मध्ये पंधरावी जनगणना करण्यात आली होती. त्या वेळी शहराची लोकसंख्या 14 लाख 86 हजार 53 इतकी नोंदविली होती. एप्रिल 2020 मध्ये सोळावी जनगणना होणार आहे. यंदाच्या जनगणनेची थीम "लोकसहभागातून जनकल्याण' आहे. कर उपायुक्त राहुल चौधरी व समाजकल्याण उपायुक्त अर्चना तांबे यांची मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती आली आहे. मास्टर ट्रेनरच्या नेतृत्वाखाली आधिपत्याखाली फील्ड ट्रेनरची नियुक्ती केली जाणार आहे. 


जनगणनेबरोबरच राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर (एनपीआर)चीही नोंदणी

जनगणनेसाठी प्रत्येक प्रगणकाला मोबाईल ऍप सुविधा दिली जाणार आहे. ऍपवरच माहिती नोंदवावी लागणार आहे. इंटरनेटची सुविधा नसलेल्या ठिकाणी अर्ज भरून घेतले जाणार आहेत. सोळा भाषांमध्ये माहिती नोंदविली जाईल. एप्रिल ते सप्टेंबर 2020 या पहिल्या टप्प्यात प्रगणक घरोघरी जाऊन घरांची सूची तयार करतील. 
9 ते 28 फेब्रुवारी 2021 या दुसऱ्या टप्प्यात जनगणना अंतिम केली जाईल. जनगणनेबरोबरच राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर (एनपीआर)चीही नोंदणी होईल. 

एका घरासाठी 31 प्रश्‍न 

प्रगणकाकडून 31 प्रश्‍नांच्या आधारे माहिती भरून घेतली जाणार आहे. कुटुंबप्रमुखाचे नाव, घर क्रमांक, घराची स्थिती, कुटुंब सदस्यांची संख्या, लिंग, विवाहित-अविवाहितांची संख्या, पाण्याची उपलब्धता, शौचालय, ड्रेनेज व्यवस्था, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट जोडणी, एलपीजी जोडणी, वाहनांची संख्या आदींची माहिती जनगणेच्या माध्यमातून घेतली जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com