सुळे डाव्या कालव्यास बारा वर्षात केदा आहेर यांच्या प्रयत्नातून पुरपाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सुळे डाव्या कालव्याने माघील वर्षापर्यंत ३७ किमी पर्यंत पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. मात्र येथून पुढे कालव्याला पाणी मिळत नसल्याने कालव्यासाठी जमिनी देऊनही पाण्यासाठी या भागातील शेतकरी तहानलेलेच होते.

खामखेडा (नाशिक) - सुळे डाव्या कालव्याने गेल्या पंधरवड्यापासून ४५ किमीच्या टप्प्यातील पाणी द्र्हाने ता. बागलाण येथील दरी शिवार धरणात येत असल्याने जि. प. सभापती केदा आहेर यांच्या प्रयत्नातून बारा वर्षात पहिल्यांदा पूर्ण वहन क्षमतेने वाहिला आज द्र्हाने येथे केदा आहेर यांच्या व खामखेडा, सावकी, ठेंगोडा ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले. 

सुळे डाव्या कालव्याने माघील वर्षापर्यंत ३७ किमी पर्यंत पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. मात्र येथून पुढे कालव्याला पाणी मिळत नसल्याने कालव्यासाठी जमिनी देऊनही पाण्यासाठी या भागातील शेतकरी तहानलेलेच होते. देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी, ठेंगोडा भागातील कालव्याला किमीपर्यंत पाणी मिळावे, अशी या भागातील शेतकऱ्यांची सततची मागणी होती. केदा आहेर यांनी केलेल्या पाठपुराव्याने मागील पंधरा दिवसापासून या कालव्याद्वारे या भागासाठी पाणी सोडण्यात आले होते.

आहेर यांनी कडवाधरण उपविभागाच्या अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेत. सुळे डाव्या कालव्यास ४५ किमी पर्यंत पाणी देण्याचे नियोजन केले होते. महिन्याभरापूर्वी कळवणच्या पश्चिम भागातील धरण व परिसरात झालेल्या पावसाने पुनद धरणाचे पुरपाणी सुळेडाव्या कालव्यास सोडण्यात आले होते. पुरपाण्याने ठेंगोडा व द्र्हाने शिवारातील दरी शिवार पाझर तलाव भरल्याने आज मा केदा आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी दर्हाण्याचे सरपंच अजयसिंग ठोके, बाळासाहेब मोकाटे, हरसिंग ठोके, खामखेडयाचे सरपंच बापू शेवाळे, संजय मोरे, आण्णा शेवाळे, सावकीचे माजी सरपंच काभा पवार, अरुण शिवले, पाटील, रामसिंग ठोके, बाळू वाळवे, पंकज ठोके, सागर मोकाटे, प्रवीण मेधने, कौतिक पवार व या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कालव्याला पाणी सोडल्यामुळे गेल्या पाच सहा वर्षापासून खामखेडा, सावकी, ठेंगोडा, दर्हाने गावाच्या भागातील दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या या भागाचा पाणी प्रश्न केदा आहेरांच्या प्रयत्नातून काही अंशी सुटणार असल्यामुळे देवळ्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी पाणी सुटल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. 

पुरपाण्याचा फायदा ठेंगोडा व द्र्हाने पाझर तलावापर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार असून या कालव्यावरील लहानमोठे नालाबांध, केटी वेअर खामखेडा, पिळकोस पाझर तलाव भरल्यास या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. या कालव्याला पाणी सोडल्यामुळे गेल्या पाच सहा वर्षापासून दुष्काळी परिस्थितीत व कालवा तयार होवून बारा वर्षात पहिल्यांदा या भागाचा पाणी प्रश्न काही अंशी सुटणार आहे. 

 

 

Web Title: Flood water in sule davya canal after twelve years