देशात यंदा अन्नधान्य उत्पादनात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी घट 

महेंद्र महाजन
सोमवार, 25 मार्च 2019

नाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी अन्नधान्याचे उत्पादन होणार आहे. दोन्ही हंगामांमध्ये 29 कोटी दोन लाख 50 हजार टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत 28 कोटी 13 लाख 70 हजार टन उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. उसाच्या उत्पादनातदेखील 42 लाख टनांची घट दिसते आहे. 

नाशिक - केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार देशात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात उद्दिष्टापेक्षा 88 लाख टनांनी अन्नधान्याचे उत्पादन होणार आहे. दोन्ही हंगामांमध्ये 29 कोटी दोन लाख 50 हजार टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत 28 कोटी 13 लाख 70 हजार टन उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. उसाच्या उत्पादनातदेखील 42 लाख टनांची घट दिसते आहे. 

देशात मागील पंधरा वर्षांमध्ये अन्नधान्याचे झालेले उत्पादन टनांमध्ये असे - 2003-04 - 21 कोटी 31 लाख, 2004-05 - 19 कोटी 83 लाख, 2005-06 - 20 कोटी 86 लाख, 2006-07 - 21 कोटी 72 लाख, 2007-08 - 23 कोटी 7 लाख, 2008-09 - 23 कोटी 44 लाख, 2009-10 - 21 कोटी 81 लाख, 2010-11 - 24 कोटी 44 लाख, 2011-12 - 25 कोटी 92 लाख, 2012-13 - 25 कोटी 71 लाख, 2013-14 - 26 कोटी 50 लाख, 2014-15 - 25 कोटी 20 लाख, 2015-16 - 25 कोटी 15 लाख, 2016-17 - 27 कोटी 51 लाख, 2017-18 चा दुसरा अंदाज - 27 कोटी 74 लाख. दरम्यान, यंदाच्या रब्बी हंगामात 10 कोटी 22 लाख टनांचे गव्हाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. आताच्या दुसऱ्या अंदाजानुसार नऊ कोटी 91 लाख टनांचे गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे. उसाच्या उत्पादनातदेखील उद्दिष्टाच्या तुलनेत 42 लाख टनांची घट होणार आहे. यंदा 38 कोटी 50 लाख टनांचे उसाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दुसऱ्या अंदाजानुसार उसाचे उत्पादन 38 कोटी आठ लाखांपर्यंत अपेक्षित आहे. 

पोषक धान्य उत्पादनाची घसरण 
ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, बारली अशा पोषण धान्याच्या उत्पादनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या दुसऱ्या अंदाजामध्ये घसरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. 2013-14 मध्ये चार कोटी 33 लाख, 2014-15 मध्ये चार कोटी 28 लाख टनांचे उत्पादन देशात झाले होते. 2015-16 मध्ये त्यात घसरण होऊन तीन कोटी 85 लाख, तर 2016-17 मध्ये वाढ होऊन चार कोटी 37 लाख आणि 2017-18 च्या दुसऱ्या अंदाजानुसार चार कोटी 54 लाख टनांचे उत्पादन झाले होते. यंदा चार कोटी 81 लाख टनांचे उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. यंदाच्या दुसऱ्या अंदाजानुसार मात्र चार कोटी 26 लाख टनांचे उत्पादन अपेक्षित आहे. डाळींच्या बाबतीतसुद्धा उद्दिष्टाच्या तुलनेत यंदा देशात कमी उत्पादन अपेक्षित आहे. 2017-18 मध्ये दोन कोटी 39 लाख टनांचे उत्पादन झाले होते. यंदा दोन कोटी 59 लाख टनांचे उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. दुसऱ्या अंदाजानुसार दोन कोटी 40 लाख टनांचे उत्पादन अपेक्षित धरण्यात आले आहे. 

तेलबियांच्या उत्पादनात घट 
देशात 2010-11 मध्ये 32 कोटी 47 लाख, 2013-14 मध्ये 32 कोटी 74 लाख टन इतके नऊ तेलबियांचे उत्पादन झाले होते. त्यात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, सरस, केशर आदींचा समावेश आहे. 2017-18 मध्ये 29 कोटी 88 लाख टनांचे उत्पादन झाले आणि यंदा 35 कोटी 99 लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात दुसऱ्या अंदाजानुसार 31 कोटी 50 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. 
 
डाळींची स्थिती 
(उत्पादन आकडे क्विंटलमध्ये) 
डाळ उद्दिष्ट दुसरा अंदाज 
खरीप तूर 45 लाख 36 लाख 80 हजार 
उडीद 36 लाख 33 लाख 60 हजार 
मूग 22 लाख 50 हजार 24 लाख 10 हजार

Web Title: The foodgrain production decreases by 88 lakh tonnes in the country this year