विदेशी पाहुण्यांनी वाढवलेय नांदूरमध्यमेश्‍वरचे सौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

महाराष्ट्राचे "भरतपूर' म्हणून प्रसिद्ध असलेले निफाड तालुक्‍यातील नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य विदेशी पक्ष्यांनी गजबजले आहे. पूर्व सैबेरिया, उत्तर युरोप, आफ्रिका यासह विविध देशांतील पक्षी नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये दाखल होत आहेत. कडाक्‍याच्या थंडीतही पक्ष्यांची ही जत्रा पाहण्यासाठी राज्यभरातून पक्षीप्रेमी हजेरी लावत आहेत.

रेड क्‍लस्टर, पांचाल, शॉवलर, गार्गनी, लिटील ग्रेव्ह, गडवाल, युरेशियन व्हिजन, कॉमन टिल्ट, पेंटेड स्टॉर्क, व्हाइट स्टॉर्क, ब्लॅक ऍण्ड व्हाइट आयबिज, मार्श हेरिअर, स्टॉवेल ईगल, शोल्डर काईट, शिकरा, कॉटन कुट, पर्पल हेरॉन, ऑस्प्रे, ग्रे हेरॉन, युरेशियम करी लिव्ह, रिंग प्लॉवर अशा विविध देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. प्लेमिंगोची उत्सुकता अजूनही कायम आहे. डिसेंबरअखेरीस फ्लेमिंगो येण्याची शक्‍यता आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही पक्ष्यांविषयी जागृती होण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक सहली येथे येत आहेत. पक्षीनिरीक्षणासाठी व पर्यटनासाठी येणाऱ्यांना गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, भाऊसाहेब मांढरे, पंकज चव्हाण, प्रशांत दराडे, रोशन पोटे, शंकर लोखंडे गाइडचे काम करत असून, पक्ष्यांविषयी जनजागृती करत आहेत. अमेरिका, आफ्रिका तसेच देशभरातून येथे पक्षीनिरीक्षणासाठी पक्षीप्रेमी येत आहेत.

Web Title: foreign birds enhance the beauty of nandurmadhyameshwar