महामार्गावर विदेशी दारूचा ट्रक पळविणारी टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारातील रायगडनगर- पवननगर दरम्यान दिंडोरीहून मुंबईला पाठविला जात असलेला दारूचा आशयर ट्रक अडवून चालकाचे अपहरण करून 600 दारूच्या बॉक्‍ससह ट्रकच लंपास करणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 

नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारातील रायगडनगर- पवननगर दरम्यान दिंडोरीहून मुंबईला पाठविला जात असलेला दारूचा आशयर ट्रक अडवून चालकाचे अपहरण करून 600 दारूच्या बॉक्‍ससह ट्रकच लंपास करणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 

दिंडोरीतील मॅकडोव्हेल कंपनीतून नीलेश देसले हे त्यांच्या आयशर ट्रकमधून मॅकडोवेल कंपनीचा विदेशी कंपनीचा दारू माल मुंबईत चांदिवलीला नेत असताना रायगडनगर परिसरात एका काळ्या रंगाच्या कारमधील पाच जणांनी 5 मार्चला ट्रकला कार आडवी मारून चालकाला मारहाण केली. त्याचा मोबाईल, हायवर्ड कंपनीचे विदेशी दारूचे 600 बॉक्‍सने भरलेला आयशर ट्रक लुटून नेला होता. देसले यांचे काळ्या कारमध्ये अपहरण करून सिन्नर ते घोटी मार्गावरील जंगलात सोडून दिले. वाडीवऱ्हे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल होता. 

नाशिक ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच जणांना मुद्देमालासह अटक केली. नियामत खान अजमत खान (वय 28, रा. पखाल रोड, नाशिक), अझरुद्दीन महंमद शेख (26, रा. नानावली, कठडा), आनंद प्रभाकर कोकाटे (31, रा. आनंदवली), राहुल संतोषलाल चावला (28, रा. आनंदनगर, नाशिक रोड) आणि दिलीप रामचंद्र लालचंदानी (51, रा. उपनगर, नाशिक) या संशयितांना आयशर ट्रक (एमएच 41 जी 7029), गुन्ह्यात वापरलेली शवरोले क्रूझ कार (एमएच 04 इएच 5769), हायवर्ड कंपनीचे विदेशी दारूचे एकूण 589 बॉक्‍स असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित अझरुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी चाकण, पुणे ग्रामीण, वणी येथील पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. 

Web Title: Foreign wines of the truck on the highway gang arrested