पत्नीस जाळून माजी सैनिकाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

अमळनेर - प्रताप मिल कंपाउंड परिसरातील अनिल खैरनार याने पत्नीस पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न करत रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) पहाटे चारच्या सुमारास घडली. 

यामध्ये पत्नी अनिता खैरनार आणि या गंभीर जखमी झाल्या. तसेच मुलगी गंभीर भाजल्याने तिचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबा बोहरी हत्येचे प्रकरण शमत नाही, तोवर अमळनेरला हादरा देणारी ही घटना घडल्याने अमळनेरकर सून्न झाले आहेत. 

प्रताप मिल कंपाउंड परिसरातील अनिल खैरनार (वय 38) याने आज पहाटे चारला त्याची पत्नी अनिता खैरनार (वय 33) गळ्यावर चाकूने वार केला. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला. आई जळत असल्याचे पाहून मुलगी तनुजा (वय पाच) हिने मिठी मारली असता तीही गंभीर भाजली. त्यानंतर अनिल खैरनारने डुबकी मारोती मंदिर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांना घरातून धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी धाव घेतली असता अनिता खैरनार व त्यांची मुलगी भाजले होते. शेजारील नागरिकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविले. या घटनेत पत्नि गंभीर जखमी असून, धुळे येथे उपचार सुरू आहेत. मात्र, मुलगी गंभीर भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल खैरनार हा माजी सैनिक असून दुसाने (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी आहे. 

या घटनेचे नेमके कारण गुलदस्त्यात असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. 

Web Title: Former Ex-Serviceman Suicide