माजी आमदार महालेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वणी (नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपा युती होण्याची ऐनवेळी शक्यता बळावल्याने व व स्वत: शरद पवार यांनी लोकसभेसाठी उमेदवारीचा शब्द दिल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. या प्रकरणी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. या संदर्भातील मेसेजेस देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसोबत शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होण्याची शक्यता आहे. माजी आमदार धनराज महाले खरचं राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? प्रवेश केला तर स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनीक काय भूमिका घेणार? तसेच महालेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यास राष्ट्रवादीकडून जोरदार तयारीत असलेल्या डाॅ. भारती पवार व कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Former MLA Mahale Leave from Shivsena