Water Supply News : धुळ्यात माजी आमदार पाटील जिल्हाधिकाऱ्यांचे पाया पडले

Dhule: Former MLA Prof. Sharad Patil. Farmers delegation with neighboring Shiv Sena.
Dhule: Former MLA Prof. Sharad Patil. Farmers delegation with neighboring Shiv Sena.esakal

Dhule News : टंचाईमुळे अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्याकडून निवेदने दिली जात आहेत; परंतु दीड महिन्यापासून मागणीची दखल घेतली जात नसल्याने व यावर निर्णयासाठी प्रा. पाटील बुधवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे पाया पडले.

आमदार पाटील यांनी सांगितले, की पांझरा नदीकाठची गावे आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्यावर दीड महिना उलटूनही जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. (Former MLA Patil District Collector Demand to release water from Akkalpada Dhule News)

त्यामुळे सरपंच, शेतकऱ्यांसह पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी पुन्हा गेलेल्या माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी ‘जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या पाया पडतो... पण पाणी सोडा,’ अशी विनंती करत जिल्हाधिकाऱ्यांच्या पाया पडले.

पांझरा नदीकाठच्या अनेक गावांना पाणीटंचाई भासत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांना पाण्याची गरज असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मेमध्ये अक्कलपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule: Former MLA Prof. Sharad Patil. Farmers delegation with neighboring Shiv Sena.
NMC News : होर्डिंगधारकांचा महापालिकेला ठेंगा; अवघ्या 13 होर्डिंगचे प्रमाणपत्र

मात्र, या वर्षी मे महिना संपण्यात आला तरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडलेले नाही. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी दोन दिवसांच्या आत धरणातून पाणी सोडण्याची सूचना द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार प्रा. पाटील यांनी दिला.

दरम्यान, जिल्ह्यात ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी धरणातून मागणीनुसार पाणी सोडले गेले. मात्र, ज्या ठिकाणी विरोधातील लोकप्रतिनिधी आहेत अशा ठिकाणी दुष्काळाचे कारण दाखवून पाणी सोडले जात नसल्याचा आरोप माजी आमदार पाटील यांनी केला आहे.

Dhule: Former MLA Prof. Sharad Patil. Farmers delegation with neighboring Shiv Sena.
Jalgaon Crime News : चोरट्यांच्या हिंमतीने आता हद्दच गाठली...! चक्क DYSPच्या दारापुढे चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com