जळगाव: नशिराबादजवळ अपघातात चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

समोरा-समोर धडकल्या भरधाव चारचाकी
नशिराबाद पोलिस ठाण्याच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या वळणावर आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) व क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवाशी आहेत.

जळगाव : भरधाव चारचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात जळगाव येथील चौघांचा जागीच दुदैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद गावाजवळील वळणावर गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. अपघात एवढा भीषण होता, की एका कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर अपघातानंतर नशिराबाद पोलिसांनी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव येथे हलवले. या अपघातात जळगाव येथील अग्रवाल कुटुंबातील चौघे जण गंभीर जखमी झाले असून जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील चौघांचा दुदैवीरीत्या मृत्यू ओढवला. या प्रकरणी पहाटे उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

समोरा-समोर धडकल्या भरधाव चारचाकी
नशिराबाद पोलिस ठाण्याच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद गावाच्या वळणावर आयटेन कार (एम.एच.19 बी.यु.8710) व क्रेटा कार (एम.एच.19 सी.यु.6633) मध्ये समोरा-समोर धडक झाली. या भीषण अपघातात आयटेन कारमधील जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील रहिवाशी आहेत.

Web Title: four dead in accident near jalgaon