Fraud Crime : स्वस्तात घर-शेतीच्या आमिषाने बहिणीची 28 लाखांत फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud news

Fraud Crime : स्वस्तात घर-शेतीच्या आमिषाने बहिणीची 28 लाखांत फसवणूक

नंदुरबार : भरडू (ता. नवापूर) येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे राहत असलेल्या बहीण व पाहुण्यांना गावाकडे स्वस्तात घर व शेती घेऊन देतो, असे सांगून त्यांच्याकडून रोख रक्कम व धनादेश वठवून २७ लाख ८८ हजार पाचशे रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार घडला आहे. (Fraud of sister for 28 lakhs with lure of cheap house farming nandurbar fraud crime news)

याबाबत बहिणीच्या फिर्यादीवरून भावाविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरडू (ता. नवापूर) येथील कोलूबाई कातुड्या वळवी नाशिक येथे राहतात. त्यांचा भाऊ धेडग्या होंजी गावित हळदाणी (ता. नवापूर) येथे राहतात.

धेडग्या गावित याने बहीण कोलूबई वळवी व पाहुणे यांना गावाकडे स्वस्तात घर व शेती घेऊन देतो, असे सांगितले. त्यामुळे बहीण-पाहुण्यांनी धेडग्या गावित यास रोख रक्कम व काही धनादेशाद्वारे पैसे दिले. त्यानुसार गावित याने बँकेचे धनादेश घेऊन ते त्याच्या विसरवाडी स्टेट बँकेतील (खाते क्रमांक ३५०७२९२३७६४) खात्यावर वठवून घेऊन बहिणीच्या बॅंक खात्यातील रक्कम काढून घेतली.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

मात्र आजपावेतो धेडग्या गावित याने बहीण-पाहुण्यांना घर व शेती घेऊन दिली नाही. पैसे परत मागितले असता तेही परत केले नाहीत. त्यामुळे धेडग्या गावित याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. बहीण-पाहुणे यांचा विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून गुन्हा धेडग्या गावित याची बहीण कोलूबाई वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.