Dhule Fraud Crime : बनावट कागदपत्रांद्वारे नोकरीचा दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

frauding institution by getting job of teacher in institution through fake documents dhule news

Dhule Fraud Crime : बनावट कागदपत्रांद्वारे नोकरीचा दोघांवर गुन्हा

धुळे : बनावट कागदपत्रांद्वारे संस्थेत शिक्षिकेची नोकरी मिळवून संस्थेसह शासनाची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी दोन जणांवर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (frauding institution by getting job of teacher in institution through fake documents dhule news)

या प्रकरणी वार (ता. धुळे) येथील शिवप्रभा संस्थेच्या प्रतिमा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्रसिंग गुलझारसिंग गिरासे (रा. सुखसागर कॉलनी, वलवाडी) यांच्या फिर्यादीनुसार मंगलसिंग गुलझारसिंग गिरासे (रा. ७ अ, राजपूत कॉलनी, देवपूर) यांनी बनावट कागदपत्रांद्वारे सुवर्णा दुर्योधन राजपूत (रा. ४ ब, बडगुजर कॉलनी, देवपूर) यांना संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीस लावले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

तत्कालीन मुख्याध्यापकाच्या शिक्क्यांच्या ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करून प्रस्ताव परस्पर शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवून शासनासह संस्थेची फसवणूक केली. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल झाला.