Nandurbar Agriculture News: सातपुड्यात आंबाबागांना बुरशीजन्य रोगाची लागण! वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

तळोदा तालुक्यातील काही ठिकाणी तसेच सातपुडा पायथा परिसरातील आंबाबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
Fungal diseases in plants. In the second picture, the fungicides being sprayed by the farmers
Fungal diseases in plants. In the second picture, the fungicides being sprayed by the farmersesakal

तळोदा : तळोदा तालुक्यातील काही ठिकाणी तसेच सातपुडा पायथा परिसरातील आंबाबागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बुरशीनाशकांची फवारणी केली जात असून, पुनःपुन्हा होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे हा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. (Fungal disease infection of mango orchards in Satpura Economic impact on farmers due to climate change Nandurbar Agriculture News)

तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, गोपाळपूर, रोझवा पुनर्वसन भागातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पिकांकडे वळला आहे. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पन्न घेत आहेत.

मात्र यंदा या परिसरातील शेतकऱ्यांना एका वेगळ्याच अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील शेतातील आंबाबागांमधील झाडांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ हवामान तसेच वातावरणात गारठा कमी-जास्त होत आहे. यामुळे आंब्यांना तुडतुडे, फुलकिडे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषितज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

काही आंबाबागांवर भुरी या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असून, ढगाळ व दमट हवामानामुळे झपाट्याने प्रसार होऊन आंबा मोहराचे देठ, फुले यावर कृषी जाळी तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहकारी बुरशीनाशकाचे फवारणी करण्यात येत आहे.

दरम्यान, परिसरात आंबाबागांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, सातपुडा पायथ्यालगत आपापल्या घरांच्या अवतीभवती ग्रामस्थांनी आंब्यांची लागवड केली असून, त्याला यंदा चांगला मोहर आल्याचे चित्र असून, यंदा चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Fungal diseases in plants. In the second picture, the fungicides being sprayed by the farmers
SAKAL Impact : अखेर ‘त्या’ निर्लेखित खोल्या पाडण्याचे आदेश! जिल्ह्यातील 108 खोल्या धोकादायक

आंब्याच्या झाडाची फांदी वाकू नये म्हणून शेतकऱ्यांकडून आतापासून झाडांना लाकडाच्या सहाय्याने आधार देण्यात आला आहे. शेतकरी आंबा पिकाच्या संरक्षणावर विशेष मेहनत घेत असून, गेल्या दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण व गारठ्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे.

एकदाचे निरभ्र व पुरेसा सूर्यप्रकाश असलेले वातावरण राहिल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लिंबावरही फवारणी

तळोदा तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत. काही परिसरात त्याच्यावरही काही प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे त्यांच्यावरही बुरशीनाशकाची फवारणी करण्यात असून, त्यांचीही निगा राखली जात आहे.

Fungal diseases in plants. In the second picture, the fungicides being sprayed by the farmers
Nandurbar: जिल्हा पोलिस दलाकडून ऑपरेशन ऑलआउट, कोम्बिंग! नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षकांचा पहिल्याच दिवसापासून धडाका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com