मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने फ्युनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन रखडले

दिगंबर पाटोळे
शुक्रवार, 16 मार्च 2018

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील बहुचर्चीत व महत्वकांक्षी असलेला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याने गुढीपाडवा व नववर्षानिमित्त भाविकांना मिळणारी फ्युनिक्युलर ट्रॉलीचेट्रॉलीची सेवा लांबणीवर पडली असून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील बहुचर्चीत व महत्वकांक्षी असलेला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याने गुढीपाडवा व नववर्षानिमित्त भाविकांना मिळणारी फ्युनिक्युलर ट्रॉलीचेट्रॉलीची सेवा लांबणीवर पडली असून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आदिमाया भगवती भक्तांना देवी दर्शन सुलभतेने व्हावे, अपंग, वृध्द, लहान गरोदर मातांना देवीचरणी पोहचता यावे यासाठी सुमारे ११० कोटी खर्चुन खाजगीकरणाच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा निश्चित झाला असतांना व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्घाटन सोहळ्यासाठी प्रस्ताविक असलेला दौरा रद्द झाल्याने फ्युनिक्युलर ट्रॉलीची सेवा मिळण्यासाठी भाविकांना पुन्हा एकदा प्रतिक्षा करावी लागणार आहे. दौरा रद्द होण्यामागे नमके कारण समजले नसले तरी ता. १७ रोजी फाल्गुन अमावस्या येत असल्याचे दौरा रद्द झाल्याची भाविकांमध्ये बोलले जात आहे.

सुरुवातीला ४ मार्च ही तारीख लोकार्पण सोहळ्यासाठी निश्चित होत होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन व यशदाच्या समितीने केलेल्या पाहाणी नंतर सुचविलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी व तांत्रिक कारणामुळे १७ मार्च ही तारीख निश्चित झाली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिळालेल्या संदेशही प्राप्त होऊन दौऱ्या संदर्भात हेलिपॅड, पोलिस बंदोबस्त आवश्यक परवानग्या बाबत प्रशासनची जय्यत तयारी सुरु होती. त्यासाठी काल (ता. १५) दुपारी कळवण येथे बैठकही पार पडली होती. प्रशासनाने बैठकांवर बैठका घेऊन नियोजनाची जय्यत तयारी करु न रंगरंगोटी, साफसफाई, हेलीफॅड, डागडुजी, दुरुस्ती, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर कंबर कसली असतांना लोकार्पन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान आता ट्रॉली व्यवस्थापनाकडून ट्रॉलीचा लोकार्पण सोहळयासाठी २२ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Web Title: funicular trolley inauguration canceled due to cancellation of Chief Minister's visit