धुळे: आबालवृद्धांचे लाडके दैवत गणरायाच्या स्वागतासाठी धुळेकर सज्ज झाले आहेत. घरगुती तसेच बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ सजली आहे. पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. २६) गणेशमूर्तीची नोंदणी, पूजा व सजावटीचे साहित्य, विविधरंगी लायटिंग व दिवे खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. यंदा मूर्तींचे दर वाढल्यामुळे लहान मूर्तींना अधिक पसंती मिळत आहे.