गरीब मुलांना मोफत शिकवणारा "अवलिया' 

गरीब मुलांना मोफत शिकवणारा "अवलिया' 

गरीब मुलांना मोफत शिकवणारा "अवलिया' 


जळगाव : आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. परंतु आजच्या आधुनिक युगात शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे. अशा परिस्थितीत दुर्गम भागातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मोफत देण्याचे कार्य अविनाश जावळे हे करीत आहेत. 
पाळधी येथील आर्यन इंटरनॅशनल स्कूलमध्ये अविनाश जावळे हे उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही ते काम सांभाळत आहेत. 2014 मध्ये शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण करत असताना अविनाश हे उजाड कुसुंबा परिसरात पाठ घेण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी ग्रामीण भागातील व गरीब मुले ही शाळेत का नाही, याची कारणे शोधली. यातून त्यांना असे लक्षात आले की, आपल्याला जेवण मिळावे, यासाठी ही मुले शिक्षण न घेता कामावर जातात. अशीच काहीशी परिस्थिती त्यांना शनिपेठ भागात देखील दिसून आली. ही मुलेही शिकावी, त्यांना चांगले संस्कार मिळावे, यासाठी अविनाश यांनी घरीच आपल्या खोलीत क्‍लास सुरू केला. यावेळी दहाच मुले आली. सुरवातीला त्यांना शिकवताना खूप अडचणी आल्या. भाषा व अंकांची ओळख नसल्याने या विद्यार्थ्यांना अगदी त्यांच्या भाषेत शिकवण्यास सुरवात केली. हळूहळू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊ लागली व आज तब्बल 43 विद्यार्थ्यांना अविनाश हे मोफत शिक्षण देत आहेत. 

11 विद्यार्थी घेतले दत्तक 
आपल्या परिसरातील गरीब विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी अविनाश जावळे यांनी अकरा विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून, त्यांना सर्व शैक्षणिक साहित्यही ते पुरवितात. 

सेकंदात करतात आकडेमोड 
अविनाश यांनी शालेय विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत गणित विषय शिकविला. यात आपल्या हाताची बोटे तसेच खेळांमधून त्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकविले. यासोबतच वैद्धिक गणित देखील विद्यार्थ्यांना शिकविले असल्याने ही मुले आज मोठी आकडेमोड चक्क काही सेकंदात पूर्ण करतात. 


पोरगं इंग्रजी बोलतं 
अविनाश जावळे यांच्यात मुलांना शिकविण्याची जिद्द असल्याने त्यांनी प्रात्यक्षिकासह ऑडिओ, व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. यात विद्यार्थ्यांना आपल्या देशाची माहिती असावी, यासाठी 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com