भाऊसाहेब फुंडकर यांच्या कार्य-कर्तृत्वावर गौरव ग्रंथ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

खामगाव - राज्याचे दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य श्री. भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे दि. 31 मे  2018 रोजी निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे 7 जून 2018 रोजी त्यांना सर्वपक्षीय सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने एक गौरव ग्रंथ महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रकाशित केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

खामगाव - राज्याचे दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य श्री. भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे दि. 31 मे  2018 रोजी निधन झाले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे 7 जून 2018 रोजी त्यांना सर्वपक्षीय सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने एक गौरव ग्रंथ महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रकाशित केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यासंदर्भात 4 जुलै 2018 रोजी दोन्ही सभागृहात संमत झालेल्या शोकप्रस्तावावर बोलतांना विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत सदर स्मृतिग्रंथाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या कार्यकतृत्वाची सर्वसामान्यांना माहिती होण्यासाठी गौरव ग्रंथाची निर्मिती करण्यात येत आहे.

या गौरव ग्रंथासाठी दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या संपर्कात असलेले विविध क्षेत्रातील सहकारी, पत्रकार, सहृद, कुटुंबिय, हितचिंतक यांच्याकडून भाऊसाहेबांच्या आठवणी, लेख, पत्र आदी साहित्य तसेच दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात यावे. अशा स्वरूपाचे साहित्य 250 ते 300 शब्दमर्यादेत संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, 1702, सतरावा मजला, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, नरिमन पॉईंट, मुंबई - 400032 या पत्त्यावर पाठविण्यात यावे. तसेच nilmadane72@gmail.com  व rajendrasankhe64@gmail.com या ई-मेल आयडीवर सुध्दा पाठविण्यात यावे, असे आवाहन वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.

Web Title: Gaurav granth on the work-credit of Bhausaheb Phundkar