‘गायत्री’ प्रकरणातील मुख्य संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नाशिक - मासिक आर्थिक गुंतवणुकीतून लकी ड्रॉद्वारे बक्षिसांचे आमिष दाखवून तब्बल १० हजार गुंतवणूकदारांना नऊ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य संशयितास शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. मॉ गायत्री मार्केटिंग कंपनीचा मुख्य संशयित प्रद्युम्न भगवंतराव गावंडे (रा. विहितगाव, नाशिकरोड) वर्षापासून मध्य प्रदेशातील मूळगावी दडून बसला होता. 

मॉ गायत्री मार्केटिंग’ या नावाने संशयित गावंडे, शरद पाटील, भरत पाटील यांच्यासह ११ संशयितांनी २०१६ मध्ये कार्यालय थाटले होते. मासिक ४५० रुपयांप्रमाणे १५ महिन्यांची ही योजना होती. याद्वारे नऊ हजार ९९९ सभासद जोडण्यात आले होते. मात्र संशयितांनी नोव्हेंबर २०१७ मध्येच अचानक कार्यालयास ताळे ठोकून पोबारा केला होता.

Web Title: Gayatri Marketing Company Suspected Arrested Crime