गढूळ पाण्यावरून महासभेत रणकंदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नाशिक - वर्षभरापासून पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नाशिककरांना आता गढूळ पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच काही प्रभागांमध्ये एकवेळ; पण पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे दिलेले आश्‍वासन पुरे करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज महासभेत नगरसेवकांनी एकत्रित संताप व्यक्त करीत पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले.

गेल्या वर्षी धरणातील अपुऱ्या साठ्यामुळे शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा पुरेसा पाऊस झाल्यानंतर प्रशासनाकडून पाणी कपात मागे घेण्यात आली. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असला तरी सिडको व सातपूर विभागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकवेळ पाणीपुरवठा करताना पुरेसे पाणी देण्याचे पाणीपुरवठा विभागाने आश्‍वासन दिले होते; परंतु दोन्ही विभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने या भागातील नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अपुऱ्या पाणीपुरवठ्यातही गढूळ पाणी येत असल्याचा आरोप नगरसेवक सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, कल्पना पांडे यांनी केला.

पूर्व विभागातील टाकळी, उपनगर, डीजीपीनगरमध्ये एकवेळ व गढुळ पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा राहुल दिवे व नीलिमा आमले यांनी समोर आणला. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या दोन युनिटपैकी एक युनिट बंद आहे. चालू स्थितीतील केंद्राची क्षमता 25 असताना त्यात 35 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जात असल्याचा दिवे यांनी आरोप केला. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अपुरा पुरवठा होत असेल तर नागरिकांना आगाऊ सूचना देण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले.

जलकुंभ स्वच्छता मोहीम 

शहरातील जलकुंभांची स्वच्छता नियमितपणे होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानुसार दिवाळीपूर्वी शहरातील 84 जलकुंभ स्वच्छतेची मोहीम हाती घेणार असल्याचे आश्‍वासन पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिले. 

Web Title: General Assembly muddy water assessment kandana