एटीएममधून पडला पैशांचा पाऊस! (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

एटीएममधून पाचपटीने पैसे निघत आहेत हे कळल्यावर लोकांनी 5 तासात 2 लोख 68 हजार रूपये काढले. येथील अंबड पोलिस ठाण्यात या प्रकाराची दखल घेतली गेली. अखेरीस पोलिसांना हे एटीएम बंदोबस्तात बंद करावे लागले. 

नाशिक : नाशिकच्या विजय नगर भागात आज (ता. 19) अचानक पैशांचा पाऊस पडला. तेथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम पैसे काढताना त्यातून पाचपटीने पैसे येऊ लागले. हा प्रकार माहिती झाल्याने एटीएम जवळ पैसे काडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. 

एटीएममधून पाचपटीने पैसे निघत आहेत हे कळल्यावर लोकांनी 5 तासात 2 लोख 68 हजार रूपये काढले. येथील अंबड पोलिस ठाण्यात या प्रकाराची दखल घेतली गेली. अखेरीस पोलिसांना हे एटीएम बंदोबस्तात बंद करावे लागले. 

तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्राकार घडल्याचे बँक प्रशासनाने सांगितले. पैसे काढणाऱ्या ग्राहकांकडून पैसे वसूल केले जातील, असेही बँक प्रशासनाने सांगितले. 

Web Title: get 5 times money from atm of nashik