यादीतील घोळ मिटता मिटेना! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

यादीतील घोळ मिटता मिटेना! 
जळगाव  : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रारूप मतदारयादीतील घोळ मिटण्यास तयार नाही. यादीत प्रचंड घोळ असल्याने प्रचंड हरकती येत असून, या हरकतींची पडताळणी करून त्यावर निर्णय घेणे प्रशासनाला चांगलेच जिकिरीचे जाणार आहे. दरम्यान, हरकती घेण्यासाठी मुदत वाढवून द्यावी व यादीतील घोळ दूर करावेत, अशी मागणी सदस्यांसह राजकीय कार्यकर्त्यांमधून होत आहे. 

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये होऊ घातली असून, त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. प्रारंभी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे निदर्शनास आले. प्रभागरचना कोणतीही भौगोलिक स्थिती विचारात न घेता करण्यात आल्याचा आरोप झाला. नंतर प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात तर प्रचंड गोंधळ असल्याची स्थिती आहे. सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी या मतदारयादीवर आक्षेप घेतला असून, अभियंत्यांनी घरबसल्या यादी तयार केल्याचा आरोप होत आहे. 

लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक 
मतदारयादीतील घोळाने परिसीमा गाठल्याचे सांगितले जात आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये तर लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. नव्या रचनेतील प्रभाग क्रमांक 5 ची लोकसंख्या 23 हजार 315 असून, मतदारांची संख्या मात्र 27 हजार 165 एवढी आहे. म्हणजे लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक आहेत, हे कसे? याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. 
 
हरकतींचा पाऊस! 
घोळामुळे मतदारयाद्यांवर हरकतींचा पाऊस पडत आहे. आज 19 प्रभागांतून वेगवेगळ्या स्वरूपाच्या 97 हरकती प्राप्त झाल्या, तर आजपर्यंत दाखल हरकतींची संख्या 786 झाली आहे. या हरकतींची पडताळणी करून त्यावर निर्णय देणे कठीण असून, याद्यांमधील प्रचंड घोळामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. 
 
Web Title: ghol