कोकणातील हापूस आंब्याला जीआय टॅग

Hapus Mango
Hapus Mango

नाशिक - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड आणि परिसरातल्या हापूस आंब्याला भौगोलिक संकेतक म्हणजेच "जीआय टॅग' मिळाला आहे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील उत्पत्ती आणि त्यामुळे विशिष्ट गुणधर्म आणि लौकिक प्राप्त झालेल्या उत्पादनांना "जीआय टॅग' दिला जातो. त्यामुळे दर्जा आणि त्या भौगोलिक प्रदेशामुळे निर्माण झालेले वैशिष्ट्य यांची खात्री प्राप्त होते.

दार्जिलिंग चहा, महाबळेश्‍वर स्ट्रॉबेरी, बनारसी साडी, तिरुपती लाडू यांना "जीआय टॅग' प्राप्त झाला आहे. आंब्याचा राजा असलेला अल्फान्सो हा महाराष्ट्रात हापूस म्हणून ओळखला जातो. या आंब्याच्या अद्वितीय चवीमुळे आणि त्याचा दरवळ आणि रंगामुळेही स्थानिक बाजारपेठांबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला मोठी मागणी आहे. जगातील सर्वात लोकप्रिय फळ असलेला हा हापूस जपान, कोरिया, युरोपसह विविध देशांत निर्यात केला जातो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या नव्या बाजारपेठाही आता हापूससाठी उपलब्ध झाल्या आहेत.

'जीआय टॅग'ची 325 उत्पादने
दार्जिलिंग चहाला 2004 मध्ये देशातील पहिला "जीआय टॅग' मिळाला. देशात "जीआय टॅग' मिळालेली 325 उत्पादने आहेत. दरम्यान, शेतकरी, विणकर, कारागीर यांना उत्पन्नाची जोड मिळून दुर्गम भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना "जीआय' उत्पादनामुळे लाभ होऊ शकतो. पारंपरिक पद्धतीद्वारे आपल्या ग्रामीण कारागीरांकडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आगळे-वेगळे कौशल्य आणि कला येत असते. त्याला प्रोत्साहन देऊन या कलांचे जतनही आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com