धुळे: जिल्ह्यासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायतींमध्ये विरोधकांनी राजकारणाचे कितीही थर लावले आणि कोणतीही उंची गाठली तरी या निवडणुकांमधील सत्तेची दहीहंडी आम्हीच फोडणार, असा विश्वास आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच, धुळे महापालिका निवडणुकीत यंदा ५० पेक्षा अधिक जागा मिळवू, अशा आत्मविश्वासही त्यांनी मंगळवारी (ता. १९) व्यक्त केला.