Vidhan Sabha 2019 : "पूर्व' मध्ये महाजन यांची प्रतिष्ठा पणाला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

भाजप शिस्तीने चालणारा पक्ष असल्याचे बोलले जात होते. परंतू विधानसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असताना भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप कडून बंडखोरी केलेले सर्वचं उमेदवार माघार घेतील असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात सोमवारच्या माघारीच्या दिवशी शहर व जिल्ह्यात वेगळे चित्र दिसले.

नाशिक : उमेदवारी अर्ज माघारी पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्वचं मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवारी माघारी घेतील असा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेला दावा फोल ठरला. पूर्व मध्ये आमदार बाळासाहेब सानप व नांदगाव मधून रत्नाकर पवार यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. पूर्व मध्ये सानप यांची उमेदवारी सर्वाधिक जिव्हारी लागल्याने आता या मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी पालकमंत्र्यांवर राहणार असल्याने त्यांच्या जामनेर बरोबरचं पूर्व मतदारसंघ निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

भाजप शिस्तीने चालणारा पक्ष असल्याचे बोलले जात होते. परंतू विधानसभा निवडणुकीच्या याद्या जाहीर होत असताना भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भाजप कडून बंडखोरी केलेले सर्वचं उमेदवार माघार घेतील असा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात सोमवारच्या माघारीच्या दिवशी शहर व जिल्ह्यात वेगळे चित्र दिसले. नांदगाव मधून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या मनिषा पवार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला तरी रत्नाकर पवार यांनी मात्र अर्ज कायम ठेवतं बंडखोरीचे निशाण फडकवत ठेवले. पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी कायम ठेवल्याने पालकमंत्री महाजन यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला निवडून आणण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री महाजन यांच्या समोर राहणार आहे. 

पूर्व मध्ये विजय महत्वाचा 
भाजपकडून उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर आहे. 47 विधानसभा मतदारसंघापैकी चार-पाच जागा सोडल्यास सर्व जागा युतीच्या पारड्यात पडतील असा विश्‍वास महाजन यांना आहे. निवडून येणाऱ्या जागांमध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. परंतू या मतदारसंघात सानप यांनी बंडखोरी केल्याने महाजन यांच्यासाठी भाजपला निवडून आणणे महत्वाचे ठरणार आहे. महाजन यांच्यामुळेचं सानप यांचा पत्ता कट झाल्याने महाजन यांना ताकद दाखविण्यासाठीचं सानप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी केल्याचे बोलले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish mahajan challanged his reputation in east