Vidhan sabha : दोन दिवसात मंत्र्यांनी मतदारसंघ काढला पिंजून

सुरेश महाजन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

जामनेर : पालकमंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर महाराष्ट्राची पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून स्वतःच्या मतदारसंघात मात्र त्यांना पाहिजे तेवढा वेळ प्रचारकार्यासाठी मिळाला नसला, तरी शेवटच्या दोनच दिवसांत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत, बहुतांश मतदारांशी थेट संवाद साधला. मुख्यतः भ्रमणध्वनीवरूनच त्यांचा प्रमुख भाजपच्या कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांशी दरवेळी संपर्क असतो. याहीवेळी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रात कुठेही असले, तरी त्यांनी मतदारसंघाशी असलेला संपर्क मात्र तुटू दिला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. 

यावेळी मतदारसंघातील प्रचाराचा भार नगराध्यक्षा साधना महाजन यांनी उचलून जवळपास सर्वच गावांना भेटी देऊन, घरोघरी मतदारांशी थेट संपर्क साधून विशेषतः महिलांशी विविध विषयांवर त्या चर्चा करताना दिसल्या. साधना महाजनांसोबत पक्षाच्या महिला पदाधिकारी, नगरसेविका, काही पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आवर्जून प्रचारादरम्यान सहभागी होते. बूथप्रमुख, पन्नाप्रमुखांकडे असलेल्या जबाबदारीमुळेही भाजपच्या प्रचारयंत्रणेत भव्यता दिसून आली. पालकमंत्री महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघांची पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली आणि शेजारील अन्य मतदारसंघांशीही त्यांनी शेवटच्या दिवशीही संपर्क कमी होऊ दिला नाही. भुसावळ, सावदा आदी ठिकाणी भेटी देत, पुन्हा मतदारसंघात येऊन नेते, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक नेते- पदाधिकारी आदींशी त्यांनी संवाद साधल्याचे दिसले. स्वतःजवळ प्रचारादरम्यान त्यांनी कोणताही लवाजमा न बाळगता प्रत्येकाशी असलेल्या जवळिकीमुळेही एक वेगळीच रंगत याही वेळी दिसून आली. 
दरम्यान, पालकमंत्र्यांनी राज्यात होणाऱ्या या वेळच्या निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांना विकासकामांच्या जोरावर दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास ‘सकाळ’शी बोलताना मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girish mahajan jamner vidhansabha matdar sangh