निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार

Leopard attack in Nashik
Leopard attack in Nashik

नाशिक : नाशिकमधील निफाड तालुक्यात तारुखेडले शिवारात बिबट्याने घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला करुन तिला ठार केले. या घटनेमुळे तारुखेडले शिवार पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीखाली आल्याचे 'साम टीव्ही'च्या बातमीत म्हटले आहे. 

बिबट्याच्या या हल्ल्यामुळे पाच वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. तारुखेडले शिवारातील शरद जगताप यांच्या शेतात अशोक हांडगे शेतमजुरी करतात. त्यांचे घरही शेतातच आहे. काल (सोमवारी) रात्री साडेआठच्या सुमारास हांडगे यांची पाच वर्षे वयाची मुलगी गुड्डी घरासमोर खेळत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि त्याने तिला फरफटत ओढून नेले.

दरम्यान घरासमोर खेळणारी गुड्डी दिसत नसल्याने अशोक हांडगे यांनी अरडा ओरडा करत आसपासच्या वस्तीतल्या शेतकऱ्यांसह मुलीचा शोध घेण्यास सुरवात केली असता जवळच मुलीच्या कपड्याचे तुकडे आढळून आले. त्यानंतर जवळपास तासाभराच्या शोधानंतर सातशे ते आठशे फुटांवर शेतात मुलीचा मृतदेह आढळुन आला. या घटनेबाबत वनविभागाला कळवलं असता वनकरक्षक आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com