Dhule Crime News : साहेब, रोडरोमिओंचा बंदोबस्त करा! विद्यार्थिनींचे पोलिस निरीक्षकांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Crime News

Dhule Crime News : साहेब, रोडरोमिओंचा बंदोबस्त करा! विद्यार्थिनींचे पोलिस निरीक्षकांना साकडे

शिरपूर : साहेब, शाळा-महाविद्यालय भरते व सुटतेवेळी टवाळांचे कंपू उभे असतात, त्यांच्याकडून अश्लील शेरेबाजी होते. शाळेत येणे नकोसे वाटू लागते. मुलींना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी या रोडरोमिओंचा बंदोबस्त करा, असे साकडे येथील पांडू बापू माळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना घातले.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

आगरकर यांनी ६ डिसेंबरला शहर पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एस. कानडे, पर्यवेक्षिका ज्योती राणे, श्रीमती कुंवर आदींसह विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेतली. आगरकर यांचे स्वागत केल्यानंतर शहरातील रोडरोमिओंच्या उच्छादामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढाच विद्यार्थिनींनी वाचला.

शहरात शाळा, महाविद्यालय आणि खासगी क्लासेसजवळ टोळक्याने उभ्या राहणाऱ्या रोडरोमिओंची संख्या वाढली असून, ये-जा करणाऱ्या मुलींवर शेरेबाजी करणे, अश्लील इशारे करणे, प्रसंगी रस्ता अडविणे असे प्रकार सर्रास घडतात. तक्रार केल्यास त्यांचा त्रास आणखी वाढेल या भीतीने विद्यार्थिनी गप्प बसतात.

हेही वाचा: Dhule Crime News : वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला LCBने ठोकल्या बेड्या; बनावट चावीने करायचा हातसफाई

भरधाव दुचाकी चालवून, कर्कश हॉर्न वाजवून, दुचाकीला मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवून फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला असून, अपघाताची भीती नागरिकांना सतावते. नुकतेच पोलिसांनी मेन रोडवरील अतिक्रमण मोकळे करून रहदारीला शिस्त लावली. ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली.

हेही वाचा: Crime News : पित्यानेच रचला मुलाच्या अपहरणाचा कट