नाशिक - नैराश्‍यातून युवतीची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नाशिक : शिक्षणाअभावी नैराश्‍याने ग्रासलेल्या 18 वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. मयुरी सोनवणे (18, रा. श्रीशा सोसायटी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे युवतीचे नाव आहे. 

नाशिक : शिक्षणाअभावी नैराश्‍याने ग्रासलेल्या 18 वर्षीय युवतीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली. मयुरी सोनवणे (18, रा. श्रीशा सोसायटी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे युवतीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी ही शहरातील एका महाविद्यालयामध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होती. मात्र काही वर्षांपूर्वी तिने शिक्षण मध्येच सोडले होते. त्यामुळे तिच्या मैत्रिणींनी शिक्षण घेत, तिच्या पुढे निघू गेल्या होत्या. त्याचे शल्य सतत तिच्या मनात होते. यामुळे तिला नैराश्‍याने ग्रासले होते. याच नैराश्‍यातून मयुरी हिने काल (ता.3) रात्री साडेदहा वाजता आपल्या राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने स्वत:ला गळफास लावून घेतला.

सदर बाब लक्षात आल्यानंतर कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: girl suicide due to depression in nashik

टॅग्स